नवी दिल्ली
रस्ते बांधणी व पायाभूत विकासाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱया जीआर इन्फ्राप्रोजेक्टस्चा आयपीओ भारतीय भांडवली बाजारात लवकरच दाखल केला जाणार आहे. याकरीता कंपनीने आयपीओकरीता रीतसर अर्ज बाजारातील नियामक सेबीकडे सादर केला आहे. उदयपूरच्या या कंपनीला सदरच्या आयपीओ सादरीकरणातून 800 ते 1000 कोटी रुपये उभारायचे आहेत. या इशुमार्फत कंपनी 1 कोटी 15 लाख 8 हजार 704 इक्विटी समभागांचे सादरीकरण करणार आहे. कंपनीचा नफा आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 6 हजार 373 कोटी रुपयांवर पोहचला आहे. जो मागच्या वर्षाच्या तुलनेत समान कालावधीत 39 टक्के अधिक आहे.