25,480 कोटींना 5.7 टक्के हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गॅलेक्सोस्मिथक्लाइन पीएलसी (जीएसके) यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील प्रमुख एफएमसीजी कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हरमधील 5.7 टक्क्मयांची हिस्सेदारी जवळपास 25,480 कोटी रुपयांना विकणार आहे. कंपनीला हिंदुस्तान युनिलिव्हरसोबत आपल्या गॅलेक्सोस्मिथक्लाईन कंझ्युमर हेल्थकेअरच्या एकत्रित आल्याच्या योजनेतील हिस्सेदारीच्या स्वरुपातील समभाग प्राप्त झाले होते.
जीएसकेने दिलेल्या एका माहितीनुसार आपल्या सहाय्यक गॅलेक्सोस्मिथक्लाइन कंपनी आणि हॉर्लेक्स यांच्याआधारे एचयूएलमध्ये 13.37 कोटीचे समभाग 1,905 रुपये प्रति समभाग विकण्यासाठी सहमती दाखवली आहे. तसेच सदरचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर जीएसकेच्या जवळ एचयूएलमधील कोणतीही हिस्सेदारी राहणार नसल्याचे म्हटले आहे.
घोषणा जीएसकेकडून 1 एप्रिल 2020 रोजी भारतामधील आपल्या प्रसिद्ध हेल्थकेअर ड्रिक ब्रँड हॉर्लेक्स आणि अन्य हेल्थकेअर पोषण उत्पादनांचे हिंदुस्तान युनिलिव्हरला विकण्याची घोषणा करण्यात आली होती.