बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी गावातील नंदीपर्वत आश्रमाचे जैनमुनी आचार्य श्री १०८ कामकुमार नंदी महाराज यांच्या निधनाबद्दल महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शोक व्यक्त करून या निर्घृण हत्येचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
अहिंसेचा संदेश देणारा जैन धर्म संपूर्ण मानवजातीसाठी आदर्श आहे, असे त्यांनी निवेदन प्रसिद्ध केले आहे. अशा धर्मातील ऋषीमुनींच्या हत्येमुळे आपणाला प्रचंड वेदना झाल्या आहेत. त्यांच्या भक्तांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना त्यांनी केली. शिवाय गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.
Previous Articleकोल्हापूर शहराच्या विविध प्रश्नांवर शासनाकडून कार्यवाही; आमदार जयश्री जाधव यांची माहिती
Next Article मनिका बात्रा पराभूत