मुंबई
केरळातील दागिने विक्री करणारी कंपनी जॉयआलुक्कास यांनी आपला आयपीओ भारतीय बाजारात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यसंदर्भातला रीतसर अर्ज कंपनीने नुकताच बाजारातील नियामक सेबीकडे दाखल केला आहे.दागिन्यांची विक्री करणाऱया जॉयआलुक्कासने सदरच्या आयपीओतून 2 हजार 300 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. विविध प्रकारचे दागिने कंपनी आपल्या शोरूम्सच्या माध्यमातून विविध शहरात विक्री करते. पुढील 2 वर्षात 8 शोरूम्स नव्याने विविध राज्यात सुरू केली जाणार आहेत.