प्रतिधिनी / वारणानगर
वाडीरत्नागिरी (ता.पन्हाळा) येथील जोतिबा डोंगरावरील चव्हाण तलावात वृद्धाचा मृतावस्थेत मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. मधुकर गणपती ठाकरे (वय ७०) असे त्याचे नाव आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली आहे. या बाबतची वर्दी पुतण्या किरण ठाकरे यांनी कोडोली पोलिसात दिली असून या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, जोतिबा येथील ठाकरे मिटके गल्ली येथे एकत्र कुटुंबात राहणारे मधुकर हे अविवाहित असून त्यांना दारूचे व्यसन होते.
ते रविवार दि.३१ जानेवारी रोजी घरातून कोणालाही न सांगता निघून गेले होते. त्यांचा नातेवाईक व इतरत्र शोध घेतला असता सापडून आले न्हवते. ते वारंवार घरात कोणालाही न सांगता निघून जात असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले होते. शनिवार दि.६ रोजी सकाळी साडेआठ वाजता जोतिबा डोंगरावरील चव्हाण तलावात मधुकर हा मृतावस्थेत पाण्यावर तरंगताना दिसून आला असल्याचे वर्दीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस नाईक कुंभार व सुतार करीत आहेत.