पंतप्रधान मोदींनी शेअर केले छायाचित्र
जी-20 च्या सदस्य देशांच्या प्रमुखांसाठी आयोजित डिनरदरम्यान एक लक्षवेधी चित्र दिसून आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार अन् अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांचे एकत्रित छायाचित्र शेअर करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केलेल्या या छायाचित्रात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन देखील दिसून येत आहेत. पंतप्रधान मोदी हे बिडेन यांना नितीश कुमार अन् सोरेन यांची ओळख करून देत असतानाचे हे छायाचित्र आहे.