प्रतिनिधी/ खेड
ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मोरवंडे-बोरज येथील ज्ञानदीप इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इ. 12वीमध्ये शिकणाऱया प्रल्हाद बामणे याने राष्ट्रीय स्तरावरील 100 मीटर ऍथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
यूथ ओरल गेम ऍण्ड स्पोर्टस् फेडरेशन ऑफ इंडियामार्फत गोवा येथे झालेल्या स्पर्धेत त्याने बाजी मारली. नेपाळ येथे होणाऱया आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी यांच्याहस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.