ऑनलाईन टीम / पुणे :
टाइमपास, सैराट, ख्वाडा, म्होरक्या, फँड्री अशा शंभरहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटात दमदार भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचे आज पुण्यात निधन झाले. ते 71 वर्षांचे होते.
धुमाळ मागील काही महिन्यांपासून आजारी होते. ‘धुमाळ काका’ या नावाने ते चित्रपट क्षेत्रात परिचित होते. नवीन कलाकारांना हक्काचे आणि मायेचे असे ते व्यक्तिमत्त्व होते. नवीन कलाकारांना ते मार्गदर्शन करायचे. त्यांनी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, छत्रपती शासन, बोन्साय, बॅलन्स, वाघेऱ्या या चित्रपटात देखील काम केले आहे. सेक्रेड गेम्स या वेबसीरिजमध्ये त्यांनी भूमिका केली होती.