प्रतिनिधी / बेळगाव
लक्ष्मीनगर, हिंडलगा येथील रहिवासी व सहकार दर्शन साप्ताहिकाचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार व म. ए. समितीचे कार्यकर्ते अरुण कानूरकर (वय 57) यांचे अल्पशा आजाराने बुधवार दि. 19 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, भाऊ, बहिणी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
गेले पंधरा दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी ‘तरुण भारत’सह अनेक दैनिकांतून सेवा बजावली होती. आपल्या पत्रकारितेची सुरुवात करताना फोटोग्राफर म्हणून नावलौकिक मिळविला. सीमाप्रश्न आणि मराठीसाठीच्या अनेक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता.