ऑनलाईन टीम / रांची :
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, त्यांची पत्नी आणि मुख्यमंत्री कार्यालयातील अन्य कर्मचाऱ्यांचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले. कोरोना चाचणीसाठी शनिवारी आरोग्य कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री, त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन, प्रेस सलाहगार अभिषेक प्रसाद, वरीष्ठ निजी सचिव सुनील श्रीवास्तव आणि सीएमओमध्ये काम करणारे अन्य अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांचे नमुने घेतले.
झारखंडचे पेयजल आणि आरोग्य मंत्री मिथिलेश ठाकूर आणि आमदार मथुरा प्रसाद मेहता यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी स्वतःला होम क्वारंटाइन करून घेतले होते.
दरम्यान, आरोग्यमंत्री मिथिलेश ठाकूर यांना रिम्स रुग्णालयात, तर आमदार मथुरा प्रसाद मेहतो यांना एका कोविड रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच सध्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी बाहेरून येणाऱ्यांना बंदी घालण्यात आली.