भाजपकडून सत्तारुढ महाआघाडीवर टीकात्र्
वृत्तसंस्था / रांची
झारखंडच्या नव्या विधानसभा भवनात अल्पसंख्याकांसाठी नमाज पठणाकरता स्वतंत्र कक्ष उपलब्ध करण्याचा मुद्दा आता वादग्रस्त ठरू लागला आहे. भाजप आमदार विरंची नारायण यांनी अल्पसंख्याक सदस्यांकरता नमाज पठणासाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करण्यात आल्यावर अन्य धर्मांसाठी देखील कक्ष उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.
विधानसभेत हिंदू आणि अन्य धार्मिक समुदायांसाठी कक्ष उपलब्ध करण्यात यावा. हिंदू, सरना, शीख, जैन आणि झारखंडमध्ये राहणाऱया सर्व धर्मांच्या आमदारांसाठी स्वतंत्र प्रार्थना कक्षाची व्यवस्था केली जावी नाराण यांनी म्हटले आहे.
मुस्लिमांसह अन्य धर्माच्या लोकांनाहीही विधानसभेत स्वतःच्या मतानुसार पूजा आणि प्रार्थना करता यावी असे त्यांचे म्हणणे आहे. झारखंड सरकारसमोर आता भाजप आमदाराच्या मागणीमुळे अडचणी वाढल्या आहेत. सर्व धर्मांसाठी स्वतंत्र व्यवस्था करणे सरकारला शक्य होणार नाही. अन्य धर्मांसाठी प्रार्थना कक्ष उपलब्ध न केल्यास हेमंत सोरेन सरकारवर अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाचा आरोप होणार आहे.