रशियाने शुक्रवारी युक्रेनमध्ये क्रूझ क्षेपणास्त्र डागून 39 जणांची हत्या केली असून रशियाने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत, अशी टीका युक्रेनचे प्रमुख झेलेन्स्की यांनी केली आहे. या हल्ल्यात मृत झालेल्यांमध्ये निरपराध नागरीकांचाच मोठय़ा प्रमाणात समावेश आहे. या हल्याचे जोरदार प्रतिसाद उमटले आहेत.
युरोपियन समुदायाने लवकरात लवकर मोठय़ा प्रमाणात शस्त्रपुरवठा युपेनला करावा. वेळ निघून जाण्याच्या आत हा शस्त्रपुरवठा झाला नाही, तर रशियाची सरशी होऊ शकते. तसेच रशियाचा आत्मविश्वास वाढून युद्धाची व्याप्ती वाढू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे. रशियाची जागतिक मानवाधिकार आयोगातून हकालपट्टी करण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला होता. या निर्णयामुळे झेलेन्स्की यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे आभार मानले आहेत.
रशियाने आता युक्रेनवर निर्णायक हल्ला करण्याची तयारी केली असल्याचे पाश्चिमात्य अभ्यासकांचे म्हणणे आहे. मात्र दुसऱया बाजूला उत्तर युपेनमधून रशियाचे सैन्य माघारी गेल्याचेही वृत्त आहे. अशा परस्पविरोधी वृत्तांमुळे या युद्धाचा शेवट नेमका कसा होणार आणि तो नेमका केव्हा होणार हे मात्र अनिश्चित आहे.