प्रतिनिधी/ बेळगाव
होनगा येथील एका शेडमध्ये झोपेत असतानाच अनोळखी वृध्दाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला असून काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
या संबंधी होनगा येथील आप्पाजी हुंदरे यांनी काकती पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. आप्पाजी यांचे स्वीटमार्ट आहे. स्वीटमार्टच्या पाठिमागे असलेल्या शेडमध्ये झोपेत असताना 60 ते 65 वर्षीय अनोळखी वृध्दाचा मृत्यू झाला आहे. काकती पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.
5.2 फूट उंची, काळसर वर्ण असे त्याचे वर्णन आहे. त्याने आपल्या अंगावर पांढऱया व निळय़ा रंगाचे लायनिंग टिशर्ट, पांढरे शर्ट, पांढरे बनियन व खाकी हाप पॅन्ट परिधान केला आहे. वरील वर्णनाच्या अनोळखी वृध्दा विषयी कोणाला माहिती असल्यास 0831-2405203 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.