नवी दिल्ली
घरापर्यंत खाद्यपदार्थांची ऑर्डर पोहच करणारी कंपनी झोमॅटो आपला आयपीओ आणणार असून याकरिताचा अर्ज एप्रिलमध्ये सेबीकडे दाखल केला जाण्याची शक्मयता आहे. या कंपनीत जॅक मा यांच्या अँट फायनान्शियलची मोठी हिस्सेदारी आहे. कंपनी आपला आयपीओ सप्टेंबरमध्ये भांडवली बाजारात दाखल करू शकतो, असे सूत्रांकडून समजते. दिल्लीच्या या कंपनीची सुरुवात 2008 मध्ये झाली होती. कंपनीत 5 हजारपेक्षा अधिक कर्मचारी काम करत आहेत.