नवी दिल्ली
वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्सच्या अभियांत्रिकी उत्कृष्ठतेसाठी व नवसंकल्पाकरीताच्या कामाची दखल घेऊन 2020 मध्ये टाटाला 98 पेटंट मिळवता आली आहेत. या पेटंटअंतर्गत कंपनीने वाहनांच्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात सुधारणा, आवाजाच्या कंपनांच्याबाबतीत तसेच औद्योगिक डिझाइनसह इतर बाबींकरीता पेटंट प्राप्त केले आहे. टाटा मोटर्स उद्योग जगतात नवकल्पना राबवण्यासाठी पूर्वीपासून प्रयत्नात राहिली आहे. नवसंकल्पांप्रती व संशोधनात्मक कार्यासाठी टाटाची घोडदौड कायम राहिलेली आहे. म्हणूनच टाटा मोटर्सला 98 पेटंट मिळाल्याचे सांगितले जात आहे.