आता लाखो ग्राहकांना सहज विकत घेता येतील फॅशनेबल आणि अत्याधुनिक घडय़ाळे
वृत्तसंस्था/ बेंगळूर
टायटन कंपनी लिमिटेडच्या सोनाटा या भारतातील सर्वात जास्त विकल्या जाणाऱया घडय़ांच्या ब्रँडने घडय़ाळांची व्हॅल्यू-फॅशन श्रेणी सादर करणारा ‘एपिक बाय सोनाटा’ हा आपला नवच सब-ब्रँड फ्लिपकार्टच्या सहयोगाने बाजारपेठेत दाखल केला आहे. या भागीदारीमुळे सोनाटा फ्लिपकार्टच्या 35 कोटींपेक्षा जास्त नोंदणीकृत व सातत्याने वाढत असलेल्या संपूर्ण देशभरात महानगरांपासून अगदी कानाकोपऱयांपर्यंत परसलेल्या ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल.
‘एपिक बाय सोनाटा’चा शुभारंभ आणि फ्लिपकार्टसोबतची भागीदारी याबाबत टायटन कंपनी लिमिटेडच्या वॉचेस अँड वेअरबेल्स डिव्हीजनच्या सीईओ श्रीमती सुपर्णा मित्रा यांनी सांगितले. ‘सोनाटा हा असा ब्रँड आहे ज्याला आजवर कोटय़वधी भारतीयांचा स्नेह आणि विश्वास लाभत आला आहे. एपिक हा नवा सब बँड सादर करून सोनाटा आपल्या वाटचालीतील एका अतिशय रोचक टप्प्यावर येऊन पोहोचलेला आहे. उत्पादनांच्या मुल्याबाबत विशेष जागरूक व चोखंदळ असलेल्या युवा, फॅशनने प्रेरित ग्राहकांना विश्वसनीय बँडची स्टायलिश आणि अतिशय किफायतशीर उत्पादने विकत घेण्याची संधी एपिक बाय सोनाटा सादर करत आहे. फ्लिपकार्टच्या आजवर सिद्ध झालेल्या ई-कॉमर्समधील क्षमता आणि ग्राहकांना अतुलनीय मूल्य मिळवून देण्याची आजवरची परंपरा हे पाहता त्यांच्यासोबत भागीदारी करताना आम्ही अतिशय उत्सूक आणि उत्साही आहोत.
टायटन कंपनीसोबतच्या भागीदारीबद्दल बोलताना फ्लिपकार्ट फॅशनचे उपाध्यक्ष श्री निशित गर्ग यांनी सांगितले. ‘एपिक बाय सोनाटा लाँच करण्यासाठी टायटन कंपनीसोबत हातमिळवणी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. कारण आम्ही असे मानतो की, संपूर्ण देशभरातील प्रत्येक ग्राहकाला सर्व नवनवीन टेंड्स उपलब्ध झाले पाहिजेत, अशी कंपनीची धारणा आहे, असे सांगण्यात आले. आता ग्राहकांना भारतातील सर्वात विश्वसनीय वॉचमेकर बँडच्या स्टायलीश घडय़ाळांच्या वैविध्यपूर्ण, विशाल श्रेणीतून आपली निवडता येईल, इतकेच नव्हे तर आमच्या सुरक्षित डिलीव्हरी प्रक्रियेमार्फत तुमची खरेदी तुम्हाला घरपोच देखील मिळेल.