भाजपचे वर्चस्व असताना अचानक शिवसेना यशस्वी
कणकवली / प्रतिनिधी:
कणकवली तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली असून धनश्री मेस्त्री या विजयी झाल्या आहेत. कलमठ ग्रामपंचायतमध्ये भाजपाचे १० तर शिवसेनेचे ६ सदस्य आहेत. अशावेळी भाजपा सरपंच बसणार असे चित्र असताना गुप्त मतदान करण्यात आले. या मतदानात शिवसेना उमेदवार धनश्री मेस्त्री व भाजपा उमेदवार सुहासिनी कांबळी यांच्यात टाय झाली. या मुळे शेवटी चिट्ठी द्वारे सरपंच निवड करण्यात आली यात शिवसेनेच्या उमेदवार धनश्री मेस्त्री यांच्या नावाची चिट्ठी निघाली व शिवसेनेच्या धनश्री मेस्त्री यांना विजयी घोषीत करण्यात आले. या विजयानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत विजयोत्सव साजरा केला. भाजपचे नेमके कोणते २ सदस्य शिवसेनेच्या गळाला लागले याच उत्तर गुलदस्त्यात आहे.