मुंबई
आघाडीवरची घडय़ाळ क्षेत्रातील कंपनी टायमेक्स ग्रुप इंडिया लिमिटेडला गेस अँड जीसी ब्रँडच्या घडय़ांळांच्या निर्मिती व वितरणाचे हक्क प्राप्त झाले आहेत. यासंदर्भात नुकताच एक करार करण्यात आला आहे. भारतात गेस आणि जीसी ब्रँडस्ची घडय़ाळे निर्मिती करण्यासोबतच वितरणाची प्रणाली आता टायमेक्सला करता येणार आहे. या भागीदारीतून टायमेक्सलाही आपल्या उत्पादनांच्या प्रती व्यवसाय विस्ताराची संधी मिळणार आहे.