मुंबई
या आठवडय़ात एकंदर दोन आयपीओ येणार असून त्यात एक सोमवारी खुला झाला आहे. टार्सन्स प्रोडक्टचा आयपीओ खुला झालाय तर 17 नोव्हेंबरला गो फॅशनचा आयपीओ दाखल होणार आहे. आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱयांसाठी हा आठवडा मोठी संधी घेऊन येणार आहे. दोन आयपीओंपैकी टार्सन्स प्रोडक्ट्स यांचा आयपीओ सोमवारी खुला झाला असून 17 नोव्हेंबरला तो बंद होणार आहे. यातून कंपनी 2038 कोटी रुपये उभारणार आहे. तर गो फॅशनचा 17 नोव्हेंबरला खुला होणारा आयपीओ 22 नोव्हेंबरला बंद होणार आहे.