दापोली प्रतिनिधी
तालुक्यामधील टाळसुरे कष्टाचीवाडी येथे आरती सणस या 32 वर्षीय महिलेचा तिच्या सासरा मधुकर सणस (64) याने सुरीने भोसकून खून केल्याची घटना मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.
घरगुती भांडणामधून मधुकरने आरतीवर सुरीच्या सहाय्याने वार केले. यामध्ये आरती घटनास्थळीच मृत झाली. त्यानंतर मधुकरने स्वत:वरदेखील सुरीने वार केले. यामध्ये गळ्यावर केलेला वार खोलवर झालेला असून त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्यास तत्काळ डेरवण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.