परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
टिळकवाडी येथील नाथ पै उद्यान बंद ठेवण्यात आले आहे. वर्ष उलटले तरी अद्याप ते उद्यान उघडले नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्याचा मोठा त्रास होत आहे. 100 कोटींच्या निधीतून 2018 आणि 19 मध्ये उद्यानाचे काम पूर्ण झाले. त्याचे उद्घाटनही झाले. त्यानंतर पुन्हा विकासकामाच्या नावाखाली हे उद्यान बंद करण्यात आले. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली. तेव्हा तातडीने हे उद्यान खुले
करावे, अशी मागणी ज्येष्ठांनी केले आहे.
या उद्यानासाठी 81 लाख 81 हजार 556 रुपये खर्च करण्यात आला आहे. आता जवळपास काम पूर्ण झाले आहे. मात्र, उद्यान बंदच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉकर्स, लहान मुले, महिला यांना मोठी समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा तातडीने हे उद्यान खुले करावे, अशी मागणी ज्येष्ठांनी केली आहे.