नवी दिल्ली
फेम टू योजनेचा लाभ उठवण्यासाठी आता विविध कंपन्या पुढे आल्या असून याचाच एक भाग म्हणून टीव्हीएस मोटरने आपल्या आयक्युब या इलेक्ट्रीक स्कुटरची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आयक्युबची किंमत कंपनीने 11 हजार 250 रुपयांनी कमी केली असल्याचे समजते. सरकारने दिलेल्या अनुदानाचा लाभ उठवून टीव्हीएसने सदरचा लाभ ग्राहकांना मिळवून देण्यासाठी किंमतीत तातडीने घट केली आहे. दिल्लीत ही गाडी आता 1 लाख 777 रुपयांना खरेदी करता येणार आहे. याआधी हिची किंमत 1 लाख 12 हजार 27 रुपये इतकी होती.