बेंगळूर
टीव्हीएस मोटर कंपनीला चालू आर्थिक वर्षात दुसऱया तिमाहीअखेर निव्वळ नफ्यात 29 टक्के इतकी वाढ प्राप्त करता आली आहे. कंपनीने जुलै ते सप्टेंबर कालावधीत 234 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. मागच्या आर्थिक वर्षात याच कालावधीत 181 कोटी रुपयांचा नफा कंपनीने कमावला होता. दुसऱया तिमाहीत उत्पन्न 6 हजार 483 कोटी रुपये इतके राहिले होते. एक वर्षाआधी ते 5 हजार 254 कोटी रुपये इतके होते.