मुंबई
दुचाकी वाहन विक्रीत आघाडी घेणाऱया टीव्हीएस मोटर्सने डिसेंबरला संपलेल्या तिसऱया तिमाहीत विक्रमी महसूलाची कमाई केली आहे. त्याचप्रमाणे कंपनीचा तिमाहीतला निव्वळ नफाही 119 टक्क्यांनी वाढला असल्याचे समजते. ऑक्टोबर-डिसेंबर कालावधीतला कंपनीचा महसूल 5 हजार 391 कोटी रुपयांवर पोहचला असून जो आजवरचा तिमाहीतला सर्वाधिक असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत हा महसूल 31 टक्के अधिक असून नफा 119 टक्के वाढून 266 कोटी रुपयांवर पोहचला आहे. कंपनीचे व्याज, कर पश्चात उत्पन्न 511 कोटींवर पोहचले आहे.