बेंगळूर
टेक्नोचा नवा बजेटमधला टेक्नोस्पार्क गो 2021 स्मार्टफोन येत्या 1 जुलैला भारतीय बाजारात लाँच केला जाणार आहे. सदरचा स्मार्टफोन हा एकदम परवडणारा आहे. त्याची किंमत 8 हजाराच्या घरात असेल. 1 जुलैला दुपारी 12 नंतर सदरचा फोन ऍमेझॉनवर विक्रीला उपलब्ध होणार आहे. 6.5 इंच एलसीडी डिस्प्ले, वॉटरट्रॉप नॉचसह येणारा हा फोन आईस जेडेइट, अक्वा ब्ल्यू व ब्लॅक या रंगात उपलब्ध होणार आहे. अफोर्डेबल गटात सदरचा फोन रेडमी व रिअलमी या फोन्सना टक्कर देईल. 13 मेगा पिक्सलचा कॅमेरा व 5000 एमएएच बॅटरी फोनला असेल.