एलॉन मस्क : 2017 मध्ये ऍपलचे सीईओs टीम कुक यांना होती संधी
कॅलिफोर्निया : इलेक्ट्रिक कार निर्मिती करणारी टेस्ला कंपनी आणि तिचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काल ऍपलने वाहन निर्मिती क्षेत्रात योजना आखण्याच्या बातमीनंतर ऍपलला आपण याआधी संधी दिल्याचे टेस्लाने म्हटले आहे. यामध्ये त्यांनी मोबाईल निर्मितीमधील दिग्गज कंपनी ऍपलला वर्ष 2017 मध्ये टेस्लाची खरेदी करण्याची संधी दिल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु यामध्ये ऍपलचे सीईओ टीम कुक यानी त्यांच्यासोबत बैठक घेण्यास नकार दिला होता.
स्वस्त खरेदीची संधी दिल्याच्या दरम्यान टेस्लाचा प्रवास अडचणीचा सुरु होता. परंतु यावर टेस्लाचे एलॉन मस्क यांनी मात्र कंपनीचा उपलब्ध किमतीमधील 10 वा भाग येईल त्या किमतीला विकण्याचा निर्णय घेतला होता.
टेस्लाचा संघर्ष
टेस्ला 2018 पर्यंत कार निर्मितीला नफ्यात आणण्यासाठी खूप संघर्ष करत होती. त्यावेळी ऍपललाही विचारणा करण्यात आली होती.ज्यावेळी मस्क यांनी खरेदीचा प्रस्ताव दिला तेव्हा टेस्लाचे बाजारमूल्य 4.6 लाख कोटी होते. जे आज 10 पटीने वाढून 45.6 लाख कोटींच्या घरात पोहोचले आहे.
ऍपल इलेक्ट्रिक कार बनविणार
ऍपलकडून सध्या सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार ऍपल इलेक्ट्रिक कार बनविण्याची योजना आखत असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु टीम कुक अगोदरच आमच्यासोबत आले असते, तर इलेक्ट्रिक कार निर्मितीत ऍपलचा प्रवेश निश्चित झाला असता असे मस्क यांनी ट्वीटमधून म्हटले आहे.