तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
एकमेकांचे विचार एकमेकांना पटत नसल्याने सख्या दोन भावात निर्माण झालेल्या टोकाच्या मतभेदातून लहान भावाने सोमवारी मध्यरात्री मोठ्या भावाच्या ठोक्यात लोखंडाची बोट घालून त्याचा खून केला. ही घटना कुमठा नाका परिसरातील पंचशील नगरात घडली.
रोहित मारुती बनसोडे ( वय 26 रा. पंचशील नगर कुमठा नाका,सोलापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर राकेश मारुती बनसोडे (वय 20 रा. पंचशील नगर कुमठा नाका) असे खून करणाऱ्या लहान भावाचे नाव आहे. दरम्यान आरोपी हा पळून जात असताना जोडभावी पोलीस ठाण्याच्या बीट मार्शलनी त्यास रुपाभवानी परिसरात पकडून सदर बाजार पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले. सदर बाजार पोलिसांकडून आरोपीकडे कसून चौकशी केली जात आहे.