वृत्तसंस्था /कॅलिफोर्निया :
जगातील प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार बनविणारी अमेरिकन कंपनी टेस्लाने जवळपास 15.78 लाख कोटी मूल्यासोबत जगातील आघाडीवरची कंपनी बनण्याचा मान मिळवलाय. टेस्लाने जपानची कंपनी टोयोटाला मागे टाकत ही कामगिरी केली आहे. अब्जाधीश एलॉन मस्कची इलेक्ट्रिक कार निर्मिती कंपनी टेस्ला लवकरच 71.43 लाख कोटीचे मूल्य प्राप्त करणार असून यामागे इलेक्ट्रिक वाहनांना वेगाने वाढत जाणारी मागणी कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते.
बुधवारी टेस्लाचे समभाग चार टक्क्मयांनी वधारण्यासोबत 83,067 रुपये प्रति समभागांच्या ज्यादा किमतीवर पोहोचले आहेत. समभागात आलेल्या तेजीनंतर टेस्लाचे मूल्य 15.78 लाख कोटींच्या घरात पोहोचले आहे. या कामगिरीने 15.48 लाख कोटी मूल्य असणाऱया टोयोटा कंपनीला मागे टाकत टेस्लाने सर्वोच्च स्थान पटकावले आहे.
नफ्यात नसणारी कंपनी ?
टेस्लाची ही कामगिरी आश्चर्य निर्माण करणारीच आहे कारण कंपनी कधीही नफ्यात राहिली नव्हती, परंतु अभ्यासकांच्या माहितीनुसार बॅटरी पॉवर असणाऱया वाहनांच्या टेक्नॉलॉजीच्या जोरावर बाजारात लीडरच्या रुपात कंपनी प्रवास करते आहे. टेस्लाच्या समभाग किमतीमधील वृद्धीने एलॉन मस्क यांच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण या कामगिरीने मस्क 4.15 लाख कोटी रुपयांचा बोनस प्राप्त करु शकतील.