एका व्यक्तीला अटक – इमारत करविली रिकामी
वृत्तसंस्था/ टोरंटो
कॅनडाच्या टोरंटामध्ये भारतीय वाणिज्य दूतावासानजीक स्थानिक प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी एक संशयास्पद पाकीट आढळून आले. या पाकिटात बॉम्ब असल्याची सूचना मिळाली होती. याचमुळे ते काही अंतरावर नेऊन नष्ट करण्यात आले.
हे पाकिट ब्लर स्ट्रीटनजीक मिळाले होते. या मार्गावर भारताच्या वाणिज्य दूतावासासोबत अन्य दूतावासांच्या इमारती आणि प्रसारमाध्यमांची कार्यालये आहेत. या घटनेनंतर भारतीय वाणिज्य दूतावासाची पूर्ण इमारत रिकामी करविण्यात आली. पोलीस पूर्वीच कथित बॉम्बच्या धमकीचा तपास करत होते. पण याप्रकरणी अधिक माहिती देण्यात आलेली नाही.
रस्त्यावर एक सूटकेस पडलेली होती. याची मिळताच पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक रोखली. बॉम्बविरोधी पथक बोलावून स्थिती नियंत्रणात आणली गेली. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करणत आली असून तपास सुरू असल्याचे टोरंटो पोलिसांकडून सांगण्यात आले.