आगामी काळात कृषी क्षेत्रात मजबूत स्थितीची शक्यता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कृषी क्षेत्रात मागील लॉकडाऊनच्या कालावधीपासून तेजीचे संकेत राहिले आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील शेतीशीसंबंधीत पायाभूत सुविधांमध्ये मजबूत स्थिती राहणार असल्याची दाट शक्यता आहे. यासोबतच आर्थिक उपलब्धता निर्माण होत जाणार असून यामध्ये रब्बीच्या पिकांचे भरघोस उत्पन्न होणार असून परिणामी ट्रक्टर मागणीत तेजी राहणार असल्याचा अंदाज इक्रा(आयसीआरए) चे उपाध्यक्ष शमशेर दीवान यांनी व्यक्त केला आहे.
उपलब्ध अहवालानुसार ट्रक्टर सेगमेंटमध्ये 2020 मध्ये वर्षाला 11 टक्क्यांच्या तुलनेत एकूण वाढ नोंदवण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2021 मधील एप्रिल ते जानेवारी या कालावधीत 7,38,685 ट्रक्टर्सची विक्री झाली आहे. यात वर्षाला 19.9 टक्क्यांची वाढ राहिली आहे. ग्रांट थॉर्नटन भारतातील एलएलपीचे पार्टनर श्रीधर व्ही यांनी कोविडद्वारा ट्रक्टर सेगमेंट सर्वात कमी प्रभावीत राहिले आहे. फक्त एप्रिल आणि मे 2020 या कालावधीत उत्पादन प्रभावीत झाल्याची मात्र नोंद करण्यात आली आहे.
यावेळी सुमन चौधरी मुख्य ऍनालिटिकल अधिकारी, अक्यूट रेटिंग ऍण्ड रिसर्च यांनी म्हटले आहे, की आर्थिक वर्ष 2022 पर्यंत ट्रक्टर विक्रीत मजबूत स्थिती राहणार असून काहीसा स्पर्धात्मक कालावधी राहणार असल्याचेही यादरम्यान स्पष्ट केले आहे.
जानेवारी 2020 मध्ये ट्रक्टर्सची नोंदणी
एप्रिल ते जून तिमाहीमध्ये कोविडसह वर्ष 2020 मध्ये ट्रक्टर्सची विक्री 11 टक्क्यांनी वाढली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (फाडा) यांच्या आकडेवारीनुसार जानेवारीमध्ये ट्रक्टर्सची नोंदणी ही वार्षिक पातळीवर 11.14 टक्क्यांनी वधारुन 60,754 युनिटवर राहिली होती.