ऑनलाईन टीम / जयपूर :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून दोन दिवशीय भारत दौऱयावर आहेत. यादरम्यान, ते सोन्या-चांदीचा वर्ख असलेल्या ताटात मिष्ठानांचा आस्वाद घेणार आहेत. त्यांना चहा देखील या सोन्या-चांदीचा वर्ख असलेल्या टी सेटमध्येच देण्यात येणार आहे.
ट्रम्प यांच्या स्वागतसाठी दिल्ली आणि अहमदाबादमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. जयपूरच्या अरुण पाबुवाल यांनी ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबासाठी खास सोन्या-चांदीची मुलामा दिलेली क्रॉकरी तयार केली आहे. ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबाचा लंच, डीनर आणि नाष्टा सोन्या-चांदीचा मुलामा दिलेल्या थाळीमध्ये हेणार आहे. तर चहा देखील सोन्या-चांदीचा वर्ख असलेल्या टी सेटमध्ये होईल.
पाबुवाल यांनी या क्रॉकरीमध्ये सोन्याचा मुलामा असलेला खास नॅपकिनीही तयार केला आहे. त्यावर ट्रम्प कुटुंबियांची नावेही टाकण्यात आली आहेत. अमेरिकचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासाठीही पाबुवाल यांनी ही क्रॉकरी तयार केली होती.