वॉशिंग्टन :
अमेरिकेत रिपब्लिकन पार्टीच्या अध्यक्षीय उमेदवार होण्याच्या शर्यतीत सामील भारतीय वंशाच्या निक्की हेली यांनी डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष होण्यासाठी मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त नसल्याचे म्हटले आहे. न्यू हॅम्पशायर प्रांतात सामेवारी रिपब्लिकन पार्टीची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प अणि हेली हे जोरदार प्रचार करत आहेत. ट्रम्प यांनी अनेकदा चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचे कौतुक केले आहे. चीनकडूनच आम्हाला कोविड मिळाले. मी ट्रम्प यांच्या तुलनेत चीन आणि रशियासंबंधी अत्यंत कठोर भूमिका घेणार असल्याचे हेली यांनी म्हटले आहे.