अमेरिका व चीनचे संबंध आधी व्यापार युद्धाच्या निमित्ताने आणि आता कोरोना प्रकरणावरून कमालीचे ताणले आहेत. कोरोना प्रकरणी चीनला आरोपी करून या देशावर जागतिक निर्बंध आणण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला आहे. जगातील अनेक देशांनी चीनची उपद्रव क्षमता ध्यानी घेऊन या प्रक्रियेला मान्यताही दिली आहे. अमेरिकेची ही संघर्ष नीती पाहता अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अलीकडच्या काळात चीनविरोधी कठोर व जाहीर भूमिका घेणारे राष्ट्राध्यक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले. तथापि, या त्यांच्या प्रतिमेला तडा जाईल, असे एक पुस्तक अमेरिकेत प्रकाशित होऊ घातले आहे. ‘वॉशिग्टंन पोस्ट’सारख्या प्रति÷ित वृत्तपत्राने या पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व प्रति मिळवल्या आणि त्यातील तपशिलाने अमेरिकेसह जगात खळबळ माजली आहे. जॉन रॉबर्ट बोल्टन या अमेरिकन कायदेतज्ञाने हे पुस्तक लिहिले असून, बोल्टन हे राजकीय प्रवक्ते, रिपब्लिकन पक्षाचे सल्लागार, संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेचे राजदूत अशा जबाबदारीच्या पदांवर वावरले आहेत. ट्रम्प यांचे भूतपूर्व सल्लागार अशीही त्यांची ओळख आहे. ‘द रूम व्हेअर इट हॅपण्ड : अ व्हाईट हाऊस मेमोएर’ असे नाव असलेल्या या 577 पानी पुस्तकाने ट्रम्प यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि त्यांच्या मनमानी राजनीतीवर विस्तृत बारकाव्यांसह कठोर भाष्य केले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रकाशित होऊ घातलेल्या या पुस्तकातील तपशिलाची स्फोटकता पाहून व्हाईट हाऊसने संघराज्यीय न्यायालयात पुस्तकाच्या प्रकाशनावर तातडीने तात्पुरती बंदी आणण्याची मागणी केली आहे. तथापि, बाहेर आलेल्या तपशिलामुळे प्रकाशनापूर्वीच या पुस्तकास अमेरिकेत आणि उर्वरित जगात प्रसिद्धी मिळत असून हा ताज्या चर्चेचा विषय बनला आहे.
सदर पुस्तकात ट्रम्प यांचा सल्लागार म्हणून काम करतानाचे काही अनुभव बोल्टन यांनी कथन केले आहेत. त्यात गतवषी जपानमध्ये भरलेल्या जी-20 राष्ट्रांची बैठक आणि या दरम्यान झालेल्या ट्रम्प व चीनचे शी जीन पिंग यांच्यातील संवादांचे वर्णन आहे. ट्रम्प यांनी आरंभी जीन पिंग यांना आपला विरोधी पक्ष डेमॉक्रॅट्स, हा कट्टर चीनविरोधी असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी अचानक विषय अमेरिकेतील आगामी निवडणुकांवर आणला. निवडणूक प्रचारावर परिणाम करणारी चीनची आर्थिक क्षमता ध्वनित करीत ट्रम्प महाशयांनी शी जीनपिंग यांना चक्क ते विजयी होतील, असे पहावे, अशी विनंती केली. शेतकऱयांच्या महत्त्वावर भर देत निवडणूक प्रक्रियेचा भाग म्हणून अमेरिकेकडून अधिक प्रमाणात चीनने सोयाबिन व गहू खरेदी करावा, अशी मागणी केली. मध्यपश्चिम अमेरिकन राज्यात शेती उद्योग मोठय़ा प्रमाणात केला जातो. 2016 च्या निवडणुकीत या राज्यांनी ट्रम्प यांच्या विजयास मोठाच हातभार लावला होता. या पार्श्वभूमीवर चीनची कृषी उत्पादनांची वाढीव मागणी या राज्यांना समाधान देऊन जाईल आणि मागील निवडणुकीप्रमाणे ती आपल्या बाजूने मतदान करतील, असा हेतू ट्रम्प यांच्या संवादातून सूचित होतो हे बोल्टन यांनी आपल्या पुस्तकात स्पष्ट केले आहे. दुसऱया बाजूने इस्लामी युगर आणि इतर वांशिक जमातींना चीन देत असलेली वागणूक हा आंतरराष्ट्रीय टीकेचा विषय बनला असता आणि चीनने युगर व इतर अल्पसंख्य जमातीना कँपसची निर्मिती करून स्थानबद्ध केले असता ट्रम्प महाशयांनी जिनपिंग यांना त्यांचे असे कँपस निर्माण करण्याचे धोरण योग्य असून त्यांची निर्मिती चालू राहिली पाहिजे, असे तोंडी समर्थन दिल्याचा उल्लेखही सदर पुस्तकात आहे. अर्थात, ट्रम्प यांनी समर्थन दिलेले शी जिनपिंग हे काही एकमेव, हुकूमशहा नाहीत तर रशियाचे पुतीन, तुर्कस्थानचे इर्दोगन, सौदी अरेबियाचा राजपुत्र मोहम्मद बिन सलमान, उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांनाही ट्रम्प यांनी वेळोवेळी वादग्रस्त मुद्यांवर कसे समर्थन दिले याची माहिती या पुस्तकात दिलेली आहे. लेखक बोल्टन यांनी, ट्रम्प यांच्यावर युपेन व प्रतिस्पर्धी जो बिदेन प्रकरणी जो महाभियोग चालवला त्याला पाठिंबा दर्शविताना लेखकाने डेमॉपेट्स पक्षाने महाभियोग केवळ या प्रकरणापुरताच मर्यादित न ठेवता ट्रम्पविषयक चौकशी कार्याची व्याप्ती अधिक वाढवली असती तर समस्त अमेरिकन जनतेस आपला अध्यक्ष किती अक्षम्य व गंभीर गुन्हय़ात अडकला आहे. हे समजले असते आणि त्याला काढून टाकणे शक्मय झाले असते, असे प्रतिपादनही आपल्या लिखाणात केले आहे.
ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्या संवादातील आणखी एक वादग्रस्त मुद्दा पुढे आणताना, ट्रम्प यांनी घटनात्मक बदल करून अध्यक्षपदाचा दोन टर्म इतका मर्यादित कालावधी हटवून तो वाढविण्यास अमेरिकन्स उत्सुक असल्याचे जिनपिंग यांना सांगितले. जिनपिंग यांनी ट्रम्प यांच्यासह अधिक काळ काम करण्याची आपली इच्छा असल्याचे बोलून, अमेरिकेत खूपच अधिक वेळा निवडणुका होतात असे मनोगत जेव्हा व्यक्त केले तेव्हा ट्रम्प यांनी वरीलप्रमाणे प्रत्युत्तर दिल्याचे पुस्तकात नमूद आहे. याशिवाय ट्रम्प यांचे देश विदेशाबाबतचे ज्ञान, त्यांचे बेलगाम निर्णय, माध्यमे व पत्रकार विरोधी धोरण या अनुषंगाने तपशीलवार मजकूर सदर पुस्तकात आहे. लेखक बोल्टन यांनी 2018 ते 2019 दरम्यान ट्रम्प यांचा सल्लागार म्हणून काम पाहिले असल्याने या पुस्तकातील माहितीस निश्चित असे महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणूक जिंकून आपले पद टिकवण्यासाठी प्रसंगी राष्ट्र हिताचाही बळी ट्रम्प देऊ शकतात हे पुस्तकातून स्पष्ट करण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे. एकंदरीत या पुस्तकाने ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेस वेगळीच कलाटणी दिली आहे. या पुस्तकातील सत्यासत्यता यापुढे स्पष्ट होत जाईलच. ती जर ट्रम्प यांच्या विरोधात गेली तर त्याचा अटक परिणाम निवडणूक निकालांवर होणे शक्मय आहे.
अनिल आजगावकर मोबा.9480275418