पेठ वडगाव / प्रतिनिधी
ठाणे येथे ३० ऑगस्ट ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका माथेफिरूने केलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ पेठ वडगाव पालिकेच्या सर्व कर्मचारी संघटनांनी तीव्र निषेध केला. पालिका कर्मचार्यांनी काळ्या फिती लावून दिवसभर काम बंद आंदोलन करून पालिका प्रवेशद्वारावर या हल्ल्याच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
पेठ वडगाव पालिका कर्मचार्यांच्यावतीने पालिका प्रवेशद्वारावर एकत्र येथ निषेध नोंदवून अटक केलेल्या गुन्हेगारावर शीघ्र गतीने खटला चालवून कठोर शिक्षा होण्यासाठी शासनाकडून प्रयत्न व्हावेत यासाठी हातकणंगले तहसीलदार, वडगाव पोलीस ठाणे यांना देण्यात आले.
या आंदोलनात पालिका अधिकारी मारुती कदम,स्वप्नील रानगे, प्रकाश पाटील, मेघराज घोडके, सोमनाथ माळी, सुप्रिया गोडेकर, पूनम पाटील, अमीन तांबोळी, इब्राहीम कांडेकरी, सुरेश भोपळे, निवास धनवडे,संतोष गुरव, महेश जाधव, सुरेंद्र पोवार, ज्ञानेंद्र शिंदे, दीपक भंडारी, आशिष रोटे, गणेश चौगुले, सतिशकुमार खैरे, सविता जाधव, संदीप धनवडे आदीसह पालिका कर्मचारी उपस्थित होते.