प्रतिनिधी / ओरोस-
सिंधुदुर्गनगरी येथील डंपर आंदोलन प्रकरणी आमदार नितेश राणे व अन्य अशा एकूण ४१ संशयितांची जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर बी रोटे यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. संशयितांचा वतीने अड संग्राम देसाई, अड अविनाश परब, अड सुहास साटम यांनी काम पाहिले.
गौण खनिज वाहतूक करणाऱ्या डंपर वर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात असून त्याच्या निषेधार्थ ४ मार्च २०१६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर डंपर चालक मालक संघटने मार्फत डंपर जमा आंदोलन सुरू करण्यात आले होते. सर्वच पक्षांनी या आंदोलनात पाठिंबा दिला होता. दरम्यान आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी ५ मार्च रोजी आमदार नितेश राणे व कार्यकर्त्यांनी अनाधिकरे जिल्हाधिकारी इमारतीत घुसून सरकारी कामात अडथळा केला तसेच शासकीय मालमत्तेचे नुकसान केले याप्रकरणी गुनाहा दाखल करण्यात आला होता.