सातारा तालुका डीबीची कारवाई : चोरटय़ावर यापूर्वी अनेक गुन्हे
प्रतिनिधी/ सातारा
वाढे फाटा ते फलटण रस्त्यावर डंपर चालक बाळकृष्ण दत्तात्रय भुजबळ (रा. झणझणे (सासवड) ता. फलटण) याला लटुणाऱया अविनाश विलास दडस (रा. आरफळ ता. सातारा) या तडीपारी संपलेल्या सराईत चोरटय़ास सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे. या कारवाईचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी अभिनंदन केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 12 ऑक्टोबर रोजी बाळकृष्ण भुजबळ हा डंपर घेवून फलटण रस्त्याने चालला होता. त्याचा डंपर एअर पकडल्याने आरफळ गावच्या हद्दीत बंद पडला. त्यावेळी तिथे छोटय़ा टेम्पोतून आलेल्या अविनाश दडस याने भुजब्ळ याला तू काही दिवसांपूर्वी माझ्या गाडीला धडक दिली होती. तू माझ्या मालकाला भेटायला चल असे म्हणाला. मात्र भुजबळ याने असा कोणताचा अपघात त्याच्याकडून झाला नसल्याचे सांगितले.
मात्र खात्री करण्यासाठी मालकाकडे चल असे म्हणत दडसने भुजबळ याला छोटय़ा टेम्पोतून वडूथच्या दिशेने नेले. वडूथ येथे कालव्यावर निर्जन ठिकाणी गाडी थांबवल्यावर दडस याने भुजबळ याच्याशी झटपट करुन त्याच्या खिशातील पैसे जबरदस्तीने काढू लागला. दडसने भुजबळच्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले आणि तेथून पोबारा केला. डंपर चालक भुजबळ याने याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
प्रकार गंभीर असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी या गुन्हय़ाचा तपास करुन आरोपीला पकडण्याच्या सूचना केल्या होत्या. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी डीबी पथकास तपास करण्याच्या सूचना दिल्यानंतर पथकाने कौशल्यपूर्वक तपास संशयित अविनाश दडस यास ताब्यात घेतले असता त्याने पोलीसी खाक्या दाखवताचा गुन्हा केल्याची कबुली दिली.
पोलीस निरीक्षक सजन हंकारे, डी.बी. पथकातील हवालदार. दादा परिहार, पोलीस नाईक सुजीत भोसले, ओंकार यादव, सागर निकम, सतीश पवार, नितीराज थोरात, संदीप कुंभार, निलेश जाधव, अमित माने यांनी ही कारवाई केली. या गुन्हय़ाचा पुढील तपास उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी करत आहेत.