शिमगोत्सव मिरवणुकीसाठी डिचोली सज्ज.एक वर्षाच्या ब्रेकनंतर घडणार चित्ररथ,रोमटामेळ,लोककलेचाअविष्कार.सर्वच उत्साही वातावरण.संध्याकाळी वडाचावाडा बोर्डे येथून होणा रप्रारंभ
डिचोली/प्रतिनिधी
कोवीड महामारीमुळे एक वर्षाच्या ब्रेकनंतर डिचोली शहरात शिमगोत्सवातील “घुमचे कटर घुम…”चा निनाद घुमणार आहे. सरकारी पातळीवर होणाऱया शिमगोत्सव मिरवणुकीत जरी डिचोली शहराचे नाव नसले तरी डिचोली शिमगोत्सव समितीने अध्यक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़? यांच्या नेतृत्वाखाली डिचोलीत शिमगोत्सव मिरवणूक घडवून आणण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे डिचोलीतील लोकांनी स्वागत केले आहे. डिचोलीत आज मंगळ. दि. 29 मार्च रोजी संध्याकाळी बोर्डे येथील वडाचावाडा येथून मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे.
डिचोली शहरात गेल्या अनेक वर्षांपासून शिमगोत्सवातील मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. 2020 साली कोरोनामुळे लॉकडाउन लागू होण्यापूर्वी डिचोलीत मिरवणूक घडवाण्यात आली होती. त्यानंतर लॉकडाउन लागू होताच इतर सर्व शहरातील मिरवणूका रद्द करण्याची पाळी आली होती. त्यानंतर गेल्या वषी 2021 मध्ये कोवीड महामारी लागू असल्याने तसेच कोवीडची दुसरी लाट प्राथमिक स्थरावर असल्याने त्यावषी शिमगोत्सव मिरवणूक झाली नव्हती. तर गावागावातील पारंपरिक स्थानिक शिमगोत्सव, रोमट साजरे झाले होते.
यावषी राज्य सरकारने राज्यातील केवळ पाच शहरांमध्येच शिमगोत्सव मिरवणूक जाहीर केली होती. त्यात डिचोलीचे नाव नसल्याने डिचोलीवासीय हिरमुसले होते. त्यामुळे डिचोलीत शिमगोत्सव मिरवणूक व्हावी अशी अनेकांची.मागणी होती. या मागणीला नवनिर्वाचित आमदार.डॉ. चंद्रकांत शेटय़? यांनी उचलून धरीत डिचोलीत यावेळी शिमगोत्सव मिरवणूक व्हावी यासाठी सरकारदरबारी पुढाकार घेतला. पर्यटन महामंडळाकडे तसेच सरकारच्या संबंधीत अधिकाऱयांकडे चर्चा केली.
डिचोली शिमगोत्सव समितीतर्फे यासंबंधी एक सर्वसाधारण बैठक घेऊन शिमगोत्सव साजरा करण्यासाठी रूपरेषा ठरविण्यात आली, आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़? यांची अध्यक्षपदी व विविध उपसमित्यांची निवड करण्यात आली. या समित्यांतर्फे शिमगोत्सवाची सर्व तयारी करण्यात आली असून त्यासाठी लागणाऱया निधीसाठी विविध दात्यांकडे संपर्क साधण्यात आला आहे.
आज मंगळ दि. 29 मार्च रोजी संध्याकाळी डिचोलीत शिमगोत्सव मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. शांतादुर्गा हायस्कुलजवळील व्यासपीठावर लहान व मोठय़ा गटातील मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा होणार आहे. तर सध्या. 6 वा. बोर्डे वडाचावाडा येथे वडेश्वराला श्रीफळ ठेऊन व गाराणे घालून शिमगोत्सवातील चित्ररथ, रोमटामेळ, कलापथक मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. हि मिरवणूक बोर्डे येथून भायलीपेठ, छत्रपती शिवाजी महाराज सर्कल, दिनदयाळ भवन येथून वळसा घेऊन थेट छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ येणार व मिरवणुकीची सांगता होणार. यावषी सोनारपेठ, आतीलपेठ, नगरपालिकेसमोरून जाणार नाही. मिरवणुकीला रात्री होणारा मोठा विलंब टाळण्यासाठी यावेळी मिरवणुकीचा मार्ग बदलण्यात आला आहे. असे सांगण्यात आले.
यावेळी उत्तर गोव्यातील म्हापसा, पणजी वगळता इतर कुठेही शिमगोत्सव मिरवणूक झाली नसल्याने डिचोली शहरात या मिरवणुकीला गर्दी उसळण्याची शक्मयता आहे. त्यासाठी वाहतूक पोलीस व पोलिसांची तसेच आयोजकांचीही बरीच दमछाक होण्याची शक्मयता आहे.