लाटंबार्से मतदारसंघात भाजपला पुन्हा धक्का, मयेत भाजपचा निसटता विजय
रविराज च्यारी/डिचोली
डिचोली तालुक्मयातील चार जिल्हा पंचायत मतदारसंघांपैकी 3 मतदारसंघांवर भाजपने आपले वर्चस्व सिध्द केले. तर लाटंबार्से या सभापतींच्या मतदारसंघात भाजपला बऱयाच पिछाडीवर सोडले. मये मतदारसंघातील भाजप उमेदवाराने निसटता विजय संपादन केला. कारापूर सर्वण या मतदारसंघात भाजपने पुन्हा एकदा गड राखला. तर पाळी या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघात भाजपने विक्रमी मताधिक्क्यासह आपला विजय डौलाने साजरा केला. या संपूर्ण निकालानंतर डिचोली तालुक्मयातील राजकारणाला वेगळी दिशा मिळण्याची शक्तता जरी निर्माण झाली असली तरी सध्या तालुक्मयात भाजपनेच वर्चस्व राखले आहे, असे म्हणता येईल. त्यास केवळ एक लाटंबार्से मतदारसंघ मात्र अपवाद ठरत आहे.
जिल्हा पंचायत निवडणूक ही डिचोली तालुक्मयातील भाजप, काँग्रेससह इतरही राजकीय नेते आणि राजकारणात प्रवेश करू इच्छिणाऱयांसाठी प्रति÷sची होती. लाटंबार्से मतदारसंघात अपक्ष विरूद्ध सर्व असे समीकरण दिसून येत असताना संजय शेटय़? पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रदीप रेवोडकर यांनी 2111 मतांची आघाडी मिळवत भाजपल आणि भाजपला पाठिंबा देण्यास प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मैदानात उतरलेल्या सर्वांनाच चांगलीच चपराक दिली. मये मतदारसंघात आमदार प्रवीण झांटय़? यांच्या नेतृत्वाखाली मये आणि कारापूर सर्वण या मतदारसंघात भाजपने आपला याहीवेळी गड राखले. मयेत मतांची आघाडी अल्पच आहे. परंतु विजय महत्त्वाचा याप्रमाणे विजय साजरा केला. तर कारापूर सर्वण मतदारसंघातही भाजपला लोकांनी साथ दिली. पाळी मतदारसंघातील उमेदवार गोपाळ सुर्लकर यांनी तर विक्रमी आघाडी मिळवत भाजपच्या या मतदारसंघावरील वर्चस्वावर शिक्कामोर्तब केले. या चारही मतदारसंघातील निकालात जरी भाजपला वरच्या स्थानावर नेऊन ठेवले असले तरी पुढील राजकारणातील नवीन खेळींची चाहूल मात्र लागत आहे.
लाटंबार्सेत भाजपला जबरदस्त धक्का. अपक्ष उमेदवाराने पुन्हा सिध्द केले वर्चस्व
लाटंबार्से या सभापती राजेश पाटणेकर यांच्या मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत भाजपला माजी जि. पंचायत सदस्य संजय शेटय़? यांचे समर्थक उमेदवार प्रदीप रेवोडकर यांनी जबरदस्त धक्का दिला. या मतदारसंघात भाजपने आपली संपूर्ण शक्ती पणाला लावूनही अपक्ष उमेदवार प्रदीप रेवोडकर यांनी 2111 मतांची जबरदस्त आघाडी घेत विजय साजरा केला. प्रदीप रेवोडकर यांना 5872 मते मिळाली तर भाजपच्या श्रुती घाटवळ यांना 3751 मते मिळाली. काँग्रेसचे गोविंद मांदेकर यांना 1032 मतांवर समाधान मानावे लागले.
भाजपची संपूर्ण शक्ती ठरवली फोल.
या मतदारसंघात अपक्ष उमेदवार प्रदीप रेवोडकर म्हणजेच पर्यायाने संजय शेटय़? यांच्या विरोधात भाजपने चांगलीच रणनीती आखली होती. स्वतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या मतदारसंघाची जबाबदारी घेतली होती. भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांना पावलोपावली मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सर्वांवर जबाबदारी दिली होती. तसेच माजी आमदार नरेश सावळ यांनीही आपला पाठिंबा भाजपच्या उमेदवाराला दिल्याचे ऐकिवात होते. मात्र नंतर त्यांनी या राजकारणात आपली सावध भुमिका घेताना आपला उमेदवार नसल्याने आपण तटस्थ असल्याचे म्हटले होते. तसेच भाजपला आपण पाठिंबा देण्याचा संबंधच येत नसल्याचे म्हणून या राजकारणात आपली भूमिका स्पष्ट केली होती. तर सावळ यांच्या पाठिंब्याचा भाजपला कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नसल्याची प्रतिक्रीया शिल्पा नाईक यांनी व्यक्त करताना सावळ यांचा पूर्ण क्षमतेने लाटंबार्सेत भाजपला पाठिंबा मिळाल्यास भाजपचा उमेदवार दिड ते दोन हजार मतांच्या आघाडीने निवडून येणार, असे म्हटले होते. त्यामुळे या मतदारसंघाचा निकाल पाहता त्यांचा अंदाज खरा ठरल्याचे दिसून येते.
संजय शेटय़? यांच्या कामां?वर लोकांनी विश्वास दाखविला – प्रदीप रेवोडकर.
लाटंबार्से मतदारसंघाचे माजी जि. पंचायत सदस्य संजय शेटय़? यांनी गेली पाच वर्षे या मतदारसंघात केलेल्या भरघोस कामांवर लोकांनी विश्वास दाखविला. शेटय़? यांनी लाटंबार्से मतदारसंघात तळागळातील लोकांशी राखलेले आपले हितसंबंध याची लोकांनी आपल्याला पावती दिली. हा मतदारसंघ ओबीसी राखीव झाला असतानाही त्यांनी या राजकारणातून अलिप्त न राहता त्यांनी या मतदारसंघात आपले आव्हान कायम ठेवले आणि विजय मिळविला. यापुढे पाच वर्षे अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यावर आपण भर देणार, अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार प्रदीप रेवोडकर यांनी दिली.
हा विजय कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांचा – संजय शेटय़?
लाटंबार्से मतदारसंघात गेली पाच वर्षे सरकारच्या सहकार्याने आणि आपल्या वैयक्तिक क्षमतेप्रमाणे केलेल्या कामांची पोचपावती मतदारांनी आम्हाला दिली आहे. या मतदारसंघात लोकांशी आपला असलेला जवळचा संबंध आणि आपुलकी यामुळे लोकांनी पुन्हा एकदा आमचा स्विकार केला आहे. या विजयासाठी दिवसरात्र अथकपणे कार्य केलेल्या कार्यकर्त्यांचा हा विजय असून आता आमची या मतदारसंघातील जबाबदारी वाढली आहे. येत्या पाच वर्षात त्याच जोमाने काम करताना लोकांनी दाखविलेला विश्वास पुन्हा एकदा सार्थ ठरविण्यासाठी आम्ही काम करणार आहे. अशी प्रतिक्रिया संजय शेटय़? यांनी व्यक्त केली.
मये मतदारसंघात भाजपने गड राखला. शंकर चोडणकर यांचा निसटता विजय.
मये जि. पंचायत मतदारसंघात भाजपने निसटत्या विजयावर समाधान मानत आपला गड राखला. या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शंकर चोडणकर हे केवळ 126 मतांच्या फरकाने विजयी ठरले. शंकर चोडणकर हे सलग दुसऱयांदा जि. पंचायत सदस्य म्हणून निवडून आले आहे. अपक्ष उमेदवार प्रेमेंद्र शेट यांनी भाजपची बरीच दमछाक केल्याचे दिसून आले. भाजपचे मजबूत संघटन आणि कार्यकर्त्यांची मेहनत यामुळे मये मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्लाच राहिला आहे. परंतु यावेळी काही प्रमाणात नाराजी आणि विरोधात माजी आमदार अनंत शेट यांचे बंधू प्रेमेंद्र शेट यांचे भाजपला कडवे आव्हान होते. त्यातूनही भाजपने आपला मार्ग निसटता का होईना सुकर केला.
भाजपच्या शंकर चोडणकर यांना 3397 मते मिळाली, अपक्ष प्रेमेंद्र शेपशट यांना 3271 मते मिळाली. अपक्ष राजेश कळंगुटकर यांनी 2383 मतदार मिळवली. काँग्रेसच्या प्रसाद चोडणकर यांना 1053 मते मिळाली. अपक्ष कृष्णा वळवईकर यांना 550 मते, राष्ट्रीय समाज पक्षचे दिपकुमार मापारी यांना 313 मते तर मगोच्या नारायण तारी यांना 239 मते मिळाली. या निकालात भाजपचा विजय झाला खरा, मात्र एकेकाळी मगोचे मोठे वलय असलेल्या या मतदारसंघात मगोच्या उमेदवाराला सर्वात शेवटची जागा मिळाली. यावरून मगो पक्षाचे वलय किती खालावले आहे याचा प्रत्यय येतो.
मये हा भाजपचा बालेकिल्ला हे पुन्हा एकदा सिध्द – शंकर चोडणकर
मये मतदारसंघातील लोकांनी भाजपच्या कार्यावर आणि सरकारच्या कार्यावर सदैव विश्वास ठेवलेला आहे. याचा प्रत्यय मयेतील मतदारांनी प्रत्येक निवडणुकीत भाजपला भरघोस मते देऊन दाखवून दिला आहे. याच विश्वासाच्या जोरावर आज मयेत भाजपला पुन्हा एकदा लोकांनी विजयी केले आहे. यावरून मये हा भाजपचाच बालेकिल्ला आहे, असा स्पष्ट संदेश मयेवासीयांनी सर्वांना दिला आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय मयेतील जनतेला जाते, अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार शंकर चोडणकर यांनी व्यक्त केली.
कारापूर सर्वण मतदारसंघातही भाजपने गड राखला.
कारापूर सर्वण या मये विधानसभा मतदारसंघातील मतदारसंघात भाजपने यावेळीही आपला गड कारापूर सर्वण पंचायतीचे पंचसदस्य महेश सावंत यांच्या स्वरूपात राखला. गेल्या जि. पंचायत निवडणुकीत अंकिता नावेलकर या भाजपच्या उमेदवारीवर निवडून आल्या होत्या. यावेळी ओबीसी राखीव असलेल्या या मतदारसंघात महेश सावंत यांनी भाजप संघटन कौशल्यावर 952 मतांच्या आघाडीने बाजी मारली. या मतदारसंघाची जबाबदारी माजी महिला मोर्चा अध्यक्षा तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यांनी या मतदारसंघात मेराथॉन बैठका घेत भाजपला विजयश्री खेचून आणली.
महेश सावंत यांना 4497 मते मिळाली. मगोचे योगेश पेडणेकर यांना 3545 मते, अपक्ष अजय नाईक यांना 1015 तर मेघना येंडे यांना 440 मते मिळाली. या मतदारसंघात येणाऱया म्हावळि?गे गावातील 1160 मतदारांनी मतदान केले नव्हते. या गावात भाजपचे प्राबल्य आहे. त्यामुळे मतदान न झाल्याचा फटका भाजपला बसू शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र सदर बहिष्काराचा कोणताही परिणाम भाजपच्या मताधिक्क्मयांवर झाला नाही. उलट 952 मतांच्या आघाडीने भाजप उमेदवार महेश सावंत हे विजयी ठरले.
(ँर्दे) मयेत भाजपच्या भरीव कार्याची पावती मिळाली – प्रवीण झांटय़?.
मये मतदारसंघात केवळ भाजपचेच प्राबल्य असल्याचे पुन्हा एकदा या निकालाने दाखवून दिले आहे. मये मतदारसंघाच्या सर्व सातही पंचायतींमध्ये भाजप सरकारने केलेल्या भरीव कामांची लोकांनी पोचपावती दिली आहे. या मतदारसंघात भाजपने भरीव काम केले आहे. पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि नेता यांनी निवडणुकीत भाजपचे दोन्ही उमेदवार निवडून यावे यासाठी अक्षरशः झोकून दिले होते. त्या मेहनतीचे फळ दोन्ही मतदारसंघातून भाजप उमेदवारांच्या विजयाने मिळाले आहे. अशी प्रतिक्रिया मयेचे आमदार प्रवीण झांटय़? यांनी व्यक्त केली.
(ँर्दे) साखळी मतदारसंघात भाजपचे वर्चस्वावर शिक्कामोर्तब.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या साखळी मतदारसंघातील पाळी या जि. पंचायत मतदारसंघात भाजपने मिळविलेल्या दमदार विजयाबरोबर या मतदारसंघावरील आपले वर्चस्व निर्विवादपणे सिध्द केले आहे. भाजपचे उमेदवार साखळी भाजप मंडळ समितीचे अध्यक्ष गोपाळ सुर्लकर यांचा या मतदारसंघात विक्रमी मताधिक्क्याने विजय झाला. त्यांना विरोधी काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात 4056 मतांची आघाडी मिळाली. त्यांना एकूण 7139 मते मिळाली. तर काँग्रेस उमेदवार सुर्यकांत गावडे यांना 3083 मते मिळाली. अपक्ष उमानाथ जल्मी यांना 626 मते मिळाली.
2022 मध्ये साखळीत पुन्हा कमळच फुलणार – गोपाळ गावकर.
पाळी मतदारसंघात भाजपचे काम मोठे आहे. या कामाच्या तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत लोकांनी भरघोस मतदान केले. या विजयाचे संपूर्ण श्रेय कार्यकर्त्यांना जात असून हा विजय त्यांनाच समर्पित आहे. या निवडणुकीत भाजपला पाळी मतदारसंघातील लोकांनी दाखविलेले प्रेम पाहता येणाऱया 2022 च्या विधानसभा निवडणूकीतही साखळीत भाजपच्या कमळच फुलणार यात कोणतीही शंका नाही. राज्याच्या जनतेसाठी दिवसरात्र झटणाऱया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वावरचा लोकांनी विश्वास दाखवून दिला आहे, अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार गोपीळ सुर्लकर यांनी व्यक्त केली.
संपूर्ण मतमोजणी वाठादेव सर्वण येथील नारायण झांटय़? महाविद्यालयाच्या क्रिडा संकुलात संपन्न झाली. यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी उपजिल्हाधिकारी दिपक वायंगणकर, सहाय्यक निवडणूक अधिकारी मामलेदार प्रवीणजय पंडित, संयुक्त मामलेदार अक्षया आमोणकर, मतमोजणीचे निरिक्षक म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी गोपाळ पार्सेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी वासुदेव शेटय़? यांची उपस्थिती होती. निवडणूक अधिकारी दिपक वायंगणकर व सहाय्यक निवडणेक अधिकारी प्रवीणजय पंडित यांनी संपूर्ण मतमोजणी कोणत्याही गोधळाशिवाय आणि सुरळीतपणे पार पाडली.