बँड किंवा दिंडी पथकाविना साध्या पद्धतीने विसर्जन मिरवणूक. अवघ्याच गणेशभक्तांची उपस्थिती. कोरोनाला नष्ट करण्याचे गणरायाला साकडे.
प्रतिनिधी / डिचोली
डिचोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या तसेच डिचोली पोलीस स्थानकातील गणेशमूर्तींचे रवि. दि. 23 ऑगस्ट रोजी रात्री मोठय़ा भक्तीभावाने विसर्जन करण्यात आले. कोवीड महामारीच्या पार्शभूमीवर यावषी केवळ दिड दिवसांच्या या उत्सवात सर्व सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांना फाटा देत कोणत्याही प्रकारचे बँड किंवा दिंडी पथकाविनाच यावषी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. सदर मिरवणुकीतही अवघ्याच गणेशभक्तांची उपस्थिती पहायला मिळाली.
डिचोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यावषी सर्वसाधारण बैठकीत केवळ दिड दि वसांचा गणेशोत्सव साजरा करण्याचा ठराव घेतला होता. आणि या उत्सवासाठी निवडण्यात आलेल्या समितीवर अध्यक्षपदी मकरंद तेली यांची निवड करण्यात आली होती. डिचोली बाजारातील गणेश पूजन मंडपात पूजण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या गणेश मूर्तीची पुजा अर्चा करण्यात आली. दुसऱया दिवशी सकाळी सत्यनारायण महापूजा संपन्न झाल्यानंतर आरती संपन्न झाली.
संध्याकाळी उत्तर पुजा व महाआरती झाल्यानंतर गणेशमूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढण्यात आली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व इतर गणेश भक्तांनी गणेशमूर्ती विशेष सजविण्यात आलेल्या वाहनात बसवून दरवषीप्रमाणे कोणत्याही प्रकारचे बँड, दिंडीपथक किंवा डिजे साथीला न घेता मिरवणूक काढत गावकरवाडा डिचोली येथील नदीवर गणेश मूर्तीचे थाटात विसर्जन केले.
सध्या जगावर आलेले कोरोनाचे संकट लवकरच टळून लोकांना सुरळीत आयुष्य जगण्यासाठी आशिर्वाद द्यावा. तसेच पुढच्या वषी हा उत्सव मोठय़ा उत्साहाने व थाटात साजरा करण्यासाठी सर्व संकटे दूर करावीत, असे साकडे यावेळी डिचोली गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱयांनी गणपतीसमोर घातले.
डिचोली पोलीस स्थानकातील गणेश मूर्तीचे विसर्जन.
डिचोली पोलीस स्थानकात वर्षपध्दतीप्रमाणे पूजण्यात येणाऱया गणेशमूर्तींचे रवि. दि. 23 रोजी दिड दिवसांनी विसर्जन करण्यात आले. पोलीस स्थ धकात लही गणेशोत्सव दिड दिवसांचाच साजरा करण्याचा निर्णय पोलीस स्थानकातर्फे घेण्यात आला होता. त्यानुसार दि. 22 रोजी सकाळी गणेशमूर्तीची पुजा करण्यात आली. दोन्हीही दिवस आरती करण्यात आल्यानंतर रवि. दि. 23 रोजी संध्याकाळी उत्तर पुजा करण्यात आली. त्यानंतर गणेशमूर्ती विशेष सजविण्यात आलेल्या वाहनात विराजमान करून कोणताही गजवज न करता पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचारी व इतर गणेश भक्तांच्या साथीने गावकरवाडा डिचोली येथील नदीत विसर्जित करण्यात आली.
कारापूर तिस्क येथीलही गणेशमूर्तींचे विसर्जन कारापूर तिस्क येथे पूजण्यात येणाऱया विठ्ठलापूर कारापूर गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तींचे रविवारीच दिड दिवसांच्या उत्सवानंतर विसर्जन करण्यात आले. यावषी दिडच दिवसांचा गणेशोत्सव असल्याने तसेच कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम नसल्याने गणेशाचे पूजन कारापूर तिस्क जंक्शनवरील बसस्टॉपवरील शेडमध्येच करण्यात आले होते. सदर शेडची चांगली सजावट करून त्यात गणेश मूर्ती पुजण्यात आली होती. दिड दिवसांच्या उत्सवात कोवीड संदर्भात सरकारची सर्व मार्गदर्शक तत्वे पालन करीत सर्व धार्मिक विधी करण्यात आल्यानंतर रविवारी संध्याकाळी मिरवणूक काढत गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.