नवी दिल्ली
गेल्या डिसेंबरमध्ये विमान प्रवाशांची संख्या 45 टक्के इतकी घटली असल्याचे दिसून आले आहे. डिसेंबर 2020 मध्ये 71 लाख प्रवाशांनी विमानप्रवास केल्याची माहिती रेटिंग एजन्सी इक्राने दिली आहे. वरील घट ही डिसेंबर 2019 च्या तुलनेत नोंदली आहे. पण नोव्हेंबर 2020 च्या प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत 12 टक्के वाढ मात्र नोंदली गेली आहे. विविध कंपन्यांनी विमानात सध्या प्रवाशांची क्षमता 67 टक्क्यापर्यंत वाढवली आहे.