मुंबई : देशात खासगी क्षेत्रातील येस बँकेला डिसेंबर तिमाही 2019 मध्ये 18,564 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. बँकेला मागील वर्षातील समान तिमाहीत जवळपास 1,000 कोटी रुपयांचा नफा झाला होता. सप्टेंबर तिमाही 2019 मध्ये येस बँकेला मात्र 629 कोटी रुपयाचा तोटा झाला होता. डिसेंबर तिमाहीत बँकेचा एनपीए वाढून 18.87 टक्के झाला आहे. जो सप्टेंबर तिमाहीत 7.39 टक्क्यांवर राहिला. याच काळात बँकेने बॅड मागील वर्षाच्या या कालावधीपेक्षा वाढून 40,709 कोटी रुपयावर पोहोचला आहे.
तिमाहीच्या दरम्यान बचतीमध्ये घट
बँकेजवळ अनिवार्य स्वरुपात असणाऱया चलनात मोठी घसरण झाली आहे. या सोबतच बँकेत जमा होणाऱया बचतीचेही प्रमाण मोठय़ा प्रमाण कमी झाले आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीच्या दरम्यान बँकेच्या बचतीत 40 हजार कोटी रुपयांनी घट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच जानेवारी ते मार्च या कालावधीत बचतीमध्ये जवळपास 30 हजार कोटी रुपयांनी घट होण्याचे अनुमान आहे. सरकारकडून बँकेवर सरकारी नियम लागू केल्यामुळे येस बँकेचा सर्व कारभार भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार प्रशांत कुमार सध्या पाहत आहेत.