वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वित्त क्षेत्रातील डबघाईला आलेली कंपनी ‘डीएचएफएल’ अर्थात दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनसाठी अदानी ग्रुपसह चार जणांनी बोली लावली आहे. अदानी ग्रुपसह पिरामल एंटरप्राईझेस, अमेरिकेतील ओकट्री तसेच हाँगकाँगमधील एससी लोबी यांनीही बोली लावल्याचे सांगण्यात येते. बोली लावण्याची मुदत 17 ऑक्टोबरला संपली आहे.
डीएचएफएल या वित्त क्षेत्रात कार्य करणाऱया कंपनीचे मुंबईत मुख्य ऑफिस असून विविध शाखांमार्फत आपला व्यवसाय इतर शहरांमध्येही विस्तारीत केला आहे. शहरी व ग्रामीण भागातील अल्प व मध्यम उत्पन्न गटातील लोकांना घरासाठी वित्त पुरवठा करण्यासाठी कंपनी पुढाकार घेत होती. 2019 मध्ये डीएचएफएलने दिवाळखोरी जाहीर केली होती. या कंपनीत आता हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी वरील चौघांमध्ये चढाओढ दिसणार आहे.