वृत्तसंस्था/ हैदराबाद
:
डॉ. रेड्डीज लॅबोरेट्रीजने दिलेल्या माहितीनुसार 31 डिसेंबर 2021 रोजी समाप्त झालेल्या चालू आर्थिक वर्षातील तिसऱया तिमाहीत निव्वळ नफा हा अधिक पटीने वाढून 706.5 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. औषध कंपनीला वर्ष 2020-21 रोजीच्या समान कालावधीत 19.8 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.
डॉ.रेड्डीज लॅबने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार तिसऱया तिमाही दरम्यान कंपनीचे उत्पन्न 5,319.7 कोटी रुपयांवर राहिले आहे. जे वर्ष 2020-21 च्या समान कालावधीत 4,929.6 कोटी रुपयांवर राहिले होते.
विविध व्यवसायांमधील उत्पादनांच्या निर्मितीसाठीची गुंतवणूक कंपनीने कायम ठेवली असल्याची माहिती रेड्डीजचे उपाध्यक्ष जी व्ही प्रसाद यांनी दिली आहे.