स्वतःला ‘मॅग्नेटो’ संबोधित हा वृद्ध
अनेक जण स्वतःच्या जीवनात किमान एक टॅटू अवश्य गोंदवून घेऊ शकतात. यात एखाद्याचे नाव किंवा चिन्हे तसेच असे काही जे पाहून आनंदी होऊ अशा टॅटूला प्राधान्य देतात. लोक शरीरावर एक किंवा दोन टॅटू बनवून घेतात. पण जर्मनीतल 72 वर्षीय वोल्फगँग किरश्च यांनी स्वतःच्या शरीराच्या 98 टक्के हिस्स्यांवर टॅटू काढून घेतले आहेत. ते जर्मनीतील सर्वाधिक टॅटू असलेले व्यक्ती ठरले आहेत.
स्वतःला मॅग्नेटो म्हणवून घेणाऱया वोल्फगँग यांनी शरीरारात एकूण 86 टॅटू आणि 17 इंप्लांट बनविले ओत. त्यांचे टॅटू हात, चेहरा, पाय आणि डोळे तसेच ओठांवरही आहेत. मॅग्नेटोने केवळ पायांच्या तळव्यांवर अद्याप टॅटू काढलेला नाही. त्यांच्या काही इंप्लांटमध्ये चुंबक बसविण्यात आल्याने त्यांच्या शरीराला छोटय़ा लोखंडी वस्तू चिकटतात. याचमुळे त्यांनी स्वतःचे टोपणनाव मॅग्नेटो ठेवले आहे.
21,84,861 रुपये खर्च
पूर्व जर्मनीत लोक टॅटूकडे अत्यंत नकारात्मक दृष्टीने पाहतात. जगातील लोकांपासून स्वतःला वेगळे भासविण्याकरता मॅग्नेटो यांना 20 वर्षे लागली आहे. त्यांना टॅटू तयार करण्यासाठी 240 वेळा जावे लागले असून याकरता 720 तास लागले आहेत. त्यांनी स्वतःच्या जीवनातील सुमारे एक महिना केवळ खुर्चीवर बसून टॅटू तयार करण्यात घालविला आहे. मॅग्नेटो यांना याकरता 21,84,861 रुपयांचा खर्च आला आहे. आता त्यांना अनेकदा मॉडेलिंग किंवा फोटोशूटसाठी बोलाविले जाते.