ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे लहान भाऊ रॉबर्ट ट्रम्प यांचे शनिवारी रात्री निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. व्हाईट हाऊसने याबाबतचे परिपत्रक काढून माहिती दिली आहे.
रॉबर्ट ट्रम्प हे ट्रम्प ऑर्गनायझेशनचे माजी उच्च पदाधिकारी होते. मागील काही दिवसांपासून आजारी होते. मागील तीन महिन्यात ते दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल झाले होते. न्यूयॉर्कमधील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या आजाराबद्दल अद्याप माहिती समोर आली नाही. शुक्रवारीच ट्रम्प यांनी रुग्णालयात रॉबर्ट यांची भेट घेतली होती.
डोनाल्ड ट्रम्प यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी अतिशय जड अंतःकरणाने सांगू इच्छितो की, माझा लहान भाऊ रॉबर्ट याचे शनिवारी रात्री उशिरा दुःखद निधन झाले. तो माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान होता. त्यामुळे तो माझा केवळ लहान भाऊच नव्हता, तर एक चांगला मित्र होता. त्याची खूप आठवण येईल. मात्र आम्ही पुन्हा भेटू. त्याच्या स्मृती माझ्या मनात चिरंतन राहतील. रॉबर्ट, आय लव्ह यू. रेस्ट इन पीस’ अशा भावना डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केल्या.