- रकुलप्रीत सिंह एनसीबी चौकशीसाठी रवाना
ऑनलाईन टीम / मुंबई :
बॉलीवुडमधील अनेक सेलिब्रिटींची नावे ड्रग्ज प्रकरणात समोर आली आहेत. त्यानंतर एनसीबीकडून तपासणीला वेग आला आहे. एनसीबीने सारा अली खान, दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंह यांना समन्स बजावले असून चौकशीसाठी बोलावले आहे. आज अभिनेत्री रकुलप्रीत सिंहची चौकशी होणार असून रकुल प्रीत एनसीबी चौकशीसाठी रवाना झाली आहे.
रकुल प्रीतच्या चौकशी पूर्वीच एनसीबीने आज सकाळी मुंबईत तीन ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. एनसीबीने आज अंधेरी आणि पोवईत ही कारवाई केली आहे. मात्र याबाबत विस्तृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
दरम्यान, रकुलप्रीतने सुरुवातीला आपल्याला एनसीबीचे समन्स मिळाले नाहीत असे सांगितले होते. मात्र, एनसीबीने यावर भाष्य करत रकुलला समन्स मिळाल्याचे स्पष्ट केले होते.