बेंगळूर/प्रतिनिधी
नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी), बेंगळूर झोन यांनी मंगळवारी ‘बिग बॉस’ कन्नड सीझन सहा मधील स्पर्धक अदम पाशाला नारकोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टेंन्स (एनडीपीएस) अधिनियम 1985 अंतर्गत अटक केली.
एनसीबीने ऑगस्ट महिन्यात अटक केलेल्या पेडलर अनिका डी. कडून पाशाने ड्रग्स खरेदी केल्याचा आरोप आहे. पाशा एक स्टेज डान्सर आहे.
बेंगळूरचे विभागीय संचालक एनसीबी अमित घावटे यांनी पाशा आणि अनिका यांच्यात बरेच व्यवहार झाले होते. तपासणी दरम्यान पाशा कडून याबाबत दोन वर्षाहून अधिक काळ ते एमडीएमए घेत आहेत असे कबूल केले आहे.पाशाला ३ नोव्हेंबरपर्यंत एनसीबी कोठडी
सुनावण्यात आली आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये एनसीबीने अनिका आणि तिचे दोन सहकारी अनुप एम आणि रविंद्र आर यांना अटक केली होती. कन्नड चित्रपटाच्या कलाकारांसह अनेक कलाकारांना ड्रग्ज पुरवल्याचा संशय आहे.