समादेवी गल्ली येथील प्रकार : एटीएम सेवेसह विद्युत पुरवठाही केला बंद
बेळगाव : एटीएम केंद्राच्या शेजारी असणारे डेनेज तुंबून एटीएम मशीनचे नुकसान झाले. समादेवी गल्ली येथील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये सांडपाणी शिरून इलेक्ट्रॉनिक उपकरणासोबत एटीएम मशीनचे मोठे नुकसान झाले आहे.
समादेवी गल्ली येथे असणाऱया कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममधून रविवारी सकाळपासून डेनेजचे पाणी वाहू लागले. याची माहिती बँक कर्मचाऱयांना देण्यात आल्यानंतर एटीएमची सेवा बंद करण्यात आली. पाणी शिरून शॉर्टसर्किटसारखा प्रकार होऊ नये यासाठी विद्युत पुरवठाही बंद करण्यात आला. परंतु एटीएम मशीनसाठी लावण्यात आलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे सांडपाण्यामुळे निकामी झाली आहेत.
एटीएम केंद्राच्या बाजूला असणारा डेनेज चेंबर ब्लॉक झाल्याने हे सर्व पाणी ओव्हरफ्लो होऊन थेट एटीएम केंद्रातून बाहेर पडू लागले. याबद्दल महानगरपालिका तसेच शेजाऱयांनाही याची माहिती देण्यात आल्याचे बँकेच्या कर्मचाऱयांनी सांगितले.