नवी दिल्ली
रसायन उद्योगातील कंपनी तत्वचिंतन फार्मा केम लवकरच आपला आयपीओ भांडवली बाजारात आणणार आहे. या आयपीओतून कंपनी 450 कोटी रुपये उभारणार आहे.
यासंदर्भात कंपनीने नुकताच आपला सविस्तर अर्ज बाजारातील नियामक सेबीकडे सादर केला आहे. आयपीओअंतर्गत 225 कोटींचे ताजे समभाग बाजारात सादर केले जाणार असल्याचे कंपनीने सांगितले. ताज्या समभागांच्या माध्यमातून मिळणाऱया उत्पन्नाचा वापर उद्योग विस्तार, बडोद्यातील संशोधन व विकास केंद्राच्या विकासासाठी केला जाणार आहे.
……….