पोस्टरसह अभिनेत्रीकडून नव्या चित्रपटाची घोषणा
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशी स्वतःच्या चाहत्यांची मने आता नव्या अवताराद्वारे जिंकणार आहे. हुमाने स्वतःच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली असून याचे नाव ‘तरला’ असे आहे. हा चित्रपट प्रसिद्ध कुक तरला दलाल यांच्या जीवनावर बेतलेला आहे. हुमाने स्वतःच्या नव्या चित्रपटाची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
हुमा ही सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय असते. स्वतःच्या चाहत्यांसोबत कनेक्टेड राहण्यासाठी ती विशेष छायाचित्रे आणि चित्रफिती शेअर करत असते. हुमाने स्वतःच्या चित्रपट आणि वेबसीरिजसंबंधी घोषणा सोशल मीडियावर करण्यास प्राधान्य दिले आहे. आता तिने इन्स्टाग्रामवर तरला या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले. यात हुमाचा चित्रपटाशी निगडित लुक देखील दिसून येतोय.
पोस्टरमध्ये हुमा गृहिणीच्या वेशात दिसून येत आहे. पोस्टरच्या बॅकग्राउंडमध्ये अनेक भारतीय पदार्थ दिसून येत आहेत. हुमाने अलिकडेच महारानी या वेबसीरिजच्या दुसऱया सीझनचे शूटिंग पूर्ण केले आहे. या सीरिजचा पहिला सीझन अत्यंत चर्चेत राहिला होता. महारानी 2 चे चित्रिकरण भोपाळ, होशंगाबाद आणि जम्मू-काश्मीरमध्ये पार पडले आहे.